* घशाच्या खवखवीवर घरगुती उपाय *

       * घशाच्या खवखवीवर घरगुती उपाय * 


१ . ऋतुमानातील  बदल तुम्हाला आजारी करू शकतात . ताप येणे , घसा खवखवणे अशा छोट्या – मोठ्या कुरबुरी पावसासोबतच येतात . मग त्रास करत राहण्यापेक्षा दिवसातून दोनदा २-३ दिवस हळदीचे दूध प्यावे . 


२ . फायदे :

हळदीमध्ये जंतुनाशक आणि दाहशामक घटक असतात . त्यामुळे घसा  खवखवणे , घास गिळताना चुरचुरणे , दुखणे , सूज येणे या समस्या कमी होतात . शक्य तितके गरम हळदीचे दूध प्यायल्यास दाह कमी होण्यास मदत होते . तसेच यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते . 


       ३ . कसे कराल ? 

– ६ – ७ मिरीचे दाणे खलबत्यात जाडसर कुटावेत . 

– एक ग्लास दूध मंद आचेवर ५ – १० मिनिटे उकळावे . 

– दूध उकळायला लागल्यावर त्यात अर्धा टीस्पून हळद , कुटलेली मिरपूड आणि १ टीस्पून साखर मिसळावी . 

– मिश्रण उकळल्यावर गॅस बंद करावा . 

– हे दूध थोडे कोमट झाल्यावर प्यावे . सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना असे मिश्रण प्यायल्यास खवखवीपासून सुटका होते  . 

Leave a Comment

en_USEnglish