* घसा दुखण्याचे कारणे *

      * घसा दुखण्याचे कारणे  * 


१. घसा  दुखण्याचे एक नेहमीचे कारण म्हणजे  एलर्जिक ऱ्हायनायटिस . 


२. अनेकांना ऋतू बदलल्यावर किंवा विशिष्ट ऋतुमानात किंवा वर्षभरही त्रास होऊ शकतो . 


३. जे ध्रुमपान करीत नाहीत ( passive  smoking ) त्यानाही त्रास होऊ शकतो . 


४. डोळे , नाक व घश्यात खाज सुटू शकते डोळे लाल होतात , पापण्या देखील सुजतात . 


५ . काही औषधांमध्ये उदा . सर्दीवरील गोळीमध्ये स्युडो इफिड्रिन नावाचा एक घटक असतो . त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो , मधुमेह वाढू शकतो , हृदयविकाराला आमंत्रण होऊ शकते . डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये . 


६ . योगशास्त्रामध्ये प्राणायाम , भस्रिका काही ठराविक योगासने व जलनेती हे अत्यंत प्रभावी उपचार आहेत . तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने चे ते करावेत . 


७ . काही  रुग्णांना घशात गाठ असण्याची भावना होऊ शकते . आवाज बसतो , स्वरयंत्रणेचा दाह होतो . स्वरयंत्रणेच्या  कुर्चा सुजतात . 


८ . अगदी घरगुती उपचारांमध्ये वाफारा घेणे , ज्येष्ठ मधाची काडी चघळणे , कोमट पाणी पिणे , मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे असे  करता येते . 


९ . विश्रांती , सकस आहार व योग्य औषधोपचार घेतल्यास आजाराची लक्षणे कमी होऊन पुढील कॉम्प्लिकेशन टाळता येतात  . 


१०. मानेत गाठी येणे , ताप न जाणे , गिळताना किंवा जांभई देतांना त्रास होणे , प्लिहा सुजणे , अति लाळ गळणे असा त्रास  होत असल्यास लगेच वैघकीय सल्ला घेणे हितकारक असते . 

Leave a Comment

en_USEnglish