* टॉन्सिल्स वर घरगुती उपाय *

     * टॉन्सिल्स वर घरगुती उपाय *


१ . जंतुदोषापैकी घसासूज व टॉन्सिल सूज या आजारांची कारणे व उपचार बरेचसे सारखे असल्याने हे एकत्र घेतले आहेत . 


२ . हे आजार ( विशेषतः टॉन्सिलसूज ) बहुधा लहान मुलात जास्त प्रमाणात येतात . परंतु नुसती घसासूज कोणत्याही वयात आढळते . 

    या आजारात घसा , टॉन्सिल लालसर होतात , सुजतात . त्याबरोबर टॅप ,अंगदुखी ,इत्यादी लक्षणे दिसतात . 


३ . याबरोबर घसा दुखणे ,गिळायला त्रास होणे , मधून मधून कोरडा खोकला येतो ,घशात / टॉन्सिलमध्ये टोचल्यासारखे वाटणे या तक्रारी प्रमुख असतात . 


४ . कारणे :

विषाणू किंवा जिवाणूमुळे घसादुखी , टॉन्सिलसूज होतात . बऱ्याच वेळा सर्दी – पडशा नंतर हे दुखणे येते . हा आजार सांसर्गिक आहे . 


याशिवाय रासायनिक प्रदूषण , वावडे ( उदा . विशिष्ट खाद्यतेलांमुळे ) घशास  ताण  ( खूप बोलणे ) , इत्यादी कारणांमुळे घसा  सुजतो . 


५ . रोगनिदान :

घसा सुजला तर घशाची पाठभिंत लालसर दिसते . टॉन्सिलच्या गाठी सुजल्या असतील तर त्या नेहमीपेक्षा मोठ्या दिसतात . गाठींचा पृष्ठभाग लालसर दिसतो . 

– कधीकधी टॉन्सिलवर पांढरट ( पु ) ठिपके दिसतात . 


– घसासूज असो कि टॉन्सिलसूज , गळ्यातल्या रसग्रंथी सुजणे , दुखणे हि बहुतेक वेळा आढळणारी खून आहे . 

– कधीकधी एका बाजूच्या टॉन्सिलच्या मागे पु जमून त्या बाजूची सूज मोठी दिसते . अशा आजारात मात्र तज्ज्ञाकडे पाठवणे योग्य ठरेल . 


– घशाची तपासणी करण्यासाठी जीभ खाली दाबून धरण्यासाठी साधा स्वच्छ चमचा वापरावा . नीट दिसण्यासाठी बॅटरीचा उजेड किंवा सूर्यप्रकाश लागतो  . 


   ६ . उपचार :

– गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात . गरम दूध – हळद प्यायला द्यावी . या उपायांनी घशाला शेक मिळून लवकर  आराम पडतो . बऱ्याच वेळा केवळ एवढ्या उपयानेच घसासूज कमी होते . गुळण्या दिवसातून चार -पाच वेळा कराव्यात . 

– लाळ सुटण्यासाठी खडीसाखर हळद – गुळ  गोळी मधून मधून तोंडात ठेवावी . 

– जंतू दोष आटोक्यात आणण्यासाठी एमॉक्सी गोळ्या उपयुक्त आहेत . लहान मुलांना पातळ औषध देणे सोपे पडते . तयार औषध न मिळाल्यास वरील गोळीचे चूर्ण साखरपाणी किंवा मधातून देता येते . 

  – ताप  व अंगदुखीसाठी एस्पिरीन किंवा पॅमाल गोळ्या घ्याव्यात . 


          ७ . आयुर्वेद :

  – टॉन्सिलसूजेवर हळदपूड लावणे हा चांगला उपाय आहे आपला अंगठा  थोडा ओला केल्यास अंगठ्यास हळद चिकटते . मोठ्या माणसांना स्वतःच्या अंगठ्याने टॉन्सिलवर हळद लावणे सहज शक्य आहे . 

 -लहान मुलांना घशात हळद लावतांना मात्र थोडे कौशल्य लागते . यासाठी आपल्या अंगठ्यावर किंवा ओल्या कापसाच्या  बोळ्यावर हळदपूड घेऊन , मुलांचे तोंड उघडून चटकन हळदपूड टॉन्सिलवर लावावी . बोट चावले जाऊ नये म्हणून एका बोटाने मुलाचा गाल बाहेरून दातांमध्ये दाबून ठेवावा . हळद दोन्ही बाजूला लावावी . 


– या उपायाने ठणका व सूज कमी होते हळद लावताना मागच्या पडजिभेस किंवा घशाच्या पाठभिंतीस स्पर्श झाल्यास उलटी होण्याची शक्यता असते , पण त्याने काही बिघडत नाही . 

– याचबरोबर सकाळ -संध्याकाळ गरम पाण्यात मीठ – हळद मिसळून गुळण्या कराव्यात . याप्रमाणे दोन -तीन दिवस उपाय करावा  . 

– मध – हळद चाटण हा देखील एक चांगला उपाय आहे . 

 – घसा दुखीसाठी बाजारू गोळ्यांऐवजी अर्धा चमचा जिरे + एक चमचा साखर तोंडात धरल्यास त्याचा रस पाझरून  घसादुखी कमी होते . साखर लवकर विरघळते म्हणून आणखी एक – दोन वेळा घ्यायला हरकत नाही . हा उपाय लवकर  केल्यास बहुतेकदा घसादुखी इतर काही न करता थांबते . खूप ताप , जास्त आजार असल्यास तज्ज्ञाकडे पाठवावे . 


– घसादुखीचा त्रास वारंवार होत असल्यास त्याविरुध्द्व प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी संशमनी वटी ( गुडुचीघन ) ३ गोळ्या ३ वेळा याप्रमाणे १४ दिवस घ्यावे . 

Leave a Comment

en_USEnglish