* नाकाचे आजार *

          * नाकाचे आजार  *


१ . घ्राणेंद्रिये जे नाक त्यायोगे बऱ्या व वाईट गंधाचे ज्ञान मेंदूस होते . परंतु त्यास त्याच्या नाना ठिकाणी नाना प्रकारचे रोग होतात . व म्हणून ते इंद्रिये आपल्या परिचयातले असले तरी रोग परीक्षणार्थ त्याचे भाग पद्धतशीर रीतीने तपासण्याची माहिती पाहिजे . नुसत्या डोळ्यांनी बहुधा हे कार्य करता येते . परंतु त्याजोगता एक बारीक आरसा जो घशात घालता येऊन नाकपुड्यांच्या घशातील मागील भाग प्रकाशित करील अशा प्रकारचा जवळ असल्याने परीक्षणास मदत होते . 

२ . नाक पुड्यातील आजार :

 घुणघुणा फुटणे :- मेंदू , यकृत या ठिकाणी रक्ताधिक्य झाल्यास घुणघुणा फुटल्याने बरे वाटते . मुलांची यौनावस्था , म्हातारपण , यकृतरोग , हृद्रोग , व मूत्रपिंडाचे रोग या अवस्थेत रक्त खराब व पातळ होणे , रक्तपित्त , काही प्रकारचे ताप व रक्तस्राव होण्याची प्रकृती असणे , नाकास व डोक्याच्या कवटीच्या तळास मार , इजा , धक्के इत्यादी लागणे अगर अस्थी भंग होणे , आतील पडघास , रक्तग्रंथी असाध्यग्रंथी अगर हाडीव्रण असणे हि मुख्य करणे होत . रक्त एका अगर दोन्ही नाकपुड्यातून येते किंवा मागील छिद्रातून ते गिळले जाते अगर तोंडातून बाहेर व्हाते अगर श्वसनलिकेत शिरून खोकला व ठसका उत्पन्न करते . 


 – उपचार :

सशक्त माणसात रक्तस्राव आपोआप थांबतो व फार तर साधे उपचार करावे व थोडेफार रक्त गेल्याने फायदाच असतो . म्हणून ते अगदी ताबडतोब बंद करू नये रोग्यास उताणा निजवून त्याचे हात डोक्याकडे पसरून ठेवावे व डोके अमळ उंच राहील असे ठेवावे . त्यास बर्फ चोखण्यास द्यावा . अति थंड अगर कढत पाण्याची पिचकारी हळूहळू नाकात  सोडावी , मानेस अगर नाकास बर्फ लावावे . हात व पाय गरम ठेवावे , पोटामध्ये अर्गटचा अर्क , कॅल्शियम लॅक्टेट हि औषधे चांगली , अगर हॅझेलीन किंवा अड्रिनेलीनचे थेंब घालावे अगर त्यात कापूस भिजवून त्याचा बोळा  नाकात ठेवावा . अगर रक्तस्रावाच्या ठिकाणी विजेची पेटी लावावी वरील उपचार करण्यास अगोदर कोणते कारण  संभवत आहे हे पाहून उपचार करावे . 


३ . जुनाट पडसे  :

कारणे – मुलांची अशक्त व क्षयी प्रकृती , वरचेवर पडसे येणे , घशाच्या मागे मऊ व बिलबिलीत बारीक ग्रंथी असणे , मधील पडदी वाकडी असणे , चिंचोळ्या नाकपुड्या , तपकीर फार ओढणे इत्यादी . या रोगाचे तीन प्रकार व अवस्था  आहेत . 


– नाकातून  पांढरा  – पिवळा शेंबूड येणे , व नाक आतून लाल होणे . परंतु नाकातील त्वचा जाड न होणे व त्यातून दुर्गन्धिमय खपल्या न निघणे व नाकाचा घाण वास येणे . 


४ . नाकात व्रण होणे :

हा क्षयी व अशक्त प्रकृतीमुळे होतो व तो हाडापर्यंत गेल्याने नाक बसके व विद्रुप होते . 


-उपचार :

पोटात कॉडलिव्हर ऑइल वैगरे घेऊन प्रकृती सुधारावी व वर सांगितलेल्या धावनाने अगर आयडो फ्रॅम किंवा ल्याक्टिक ऍसिड लावून  व्रणाचे स्थान शुद्ध करावे . व्रण जुनाट असल्यास शस्त्राने खरडावा किंवा आतील नासक्या हाडाचा तुकडा काढावा . 


५ . नासाश्मरी :

मुतखड्याप्रमाणे चुन्याच्या फॉस्फेटचे किट नाकात जमून खडा बनतो व त्यामुळे शेंबूड स्त्राव , नाक चोंदणे हि लक्षणे होतात . निदान करतांना अस्थीग्रंथी अगर कॅन्सर आहे कि काय असा घोटाळा होतो . 


उपचार – 

खडा चिमट्याने ओढून काढावा . खडा मोठा असल्यास प्रथम तो फोडण्यास शस्र असते त्याने प्रथम बारीक करून काढावा . आगंतुक पदार्थ आत शिरल्यासही वरीलच उपचार उपयोगी आहेत . 

Leave a Comment

en_USEnglish