* मानेचे सौंदर्य *

              * मानेचे सौंदर्य


१. गोड  , गोंडस चेहऱ्याबरोबर जर तशीच साजेशी उंच , मान असेल तर सौंदर्यात भरच पडते . चेहरा मात्र मोठा आणि बसकी मान हि संगती चांगली दिसत नाही . 


२ . उंच कोमल आणि नितळ मान म्हणजे सौंदर्याचा मापदंड समजला जातो . वय वाढत जाते , त्याचा प्रभाव सगळ्यात आधी मानेवरच दिसायला लागतो . 


३ . सौंदर्याच्या दृष्टीने चेहऱ्यावरचे महत्त्व तर आहेच पण चेहऱ्याची काळजी घेतांना मानेकडे दुर्लक्ष होत राहिले , तर चेहरा आणि मानेच्या त्वचेच्या रंगामध्ये फरक पडतो . 


४ . चेहऱ्याबरोबर आपण मानेची देखील काळजी घेणे गरजेची आहे . तसे न केल्यास ज्या मानेमुळे सौंदर्यात भर पडते तीच मान आपल्या कुरुपतेचे देखील कारण घडू शकते . 


५ . काकडीचा पेस्ट बनवून घ्यावी , त्यात थोडं दही मिसळून मानेवर लावल्याने मानेवरचे डाग दूर होतात . 


६ . मसूर डाळ रात्रभर भिजत ठेवून सकाळी वाटून घ्यावी . त्यात मध किंवा दही मिसळून मानेवर लावून १५ -२० मिनिटापर्यंत तसेच ठेवावे . नंतर अंघोळ करावी . त्याने मानेचा काळेपणा दूर होऊन त्याला चमक येते 


७ . आठवड्यातून किमान एकदा उटण्याचा वापर करून मानेची त्वचा स्वच्छ करून घ्यावी . 


८ . फेसपॅक हा केवळ चेहऱ्यासाठीच नव्हे तर तुमच्या मानेसाठीही आवश्यक असतो . जेव्हा चेहऱ्यावर  पॅक लावतो तेव्हा तो संपूर्ण मानेलाही लावावा . 


९ . मानेचे सौंदर्य कायम ठेवण्यासाठी एक महत्वपूर्ण साधन म्हणजे साय आणि लिंबाचा रस . सायीमध्ये लिंबाचा रस मिसळून मानेभोवती मसाज करावा . 


१० . मान स्वच्छ ठेवण्यासाठी शक्यतो साबणाचा वापर करू नये . यासाठी आठवड्यातून किमान दोनदा क्लिंझिंग मिल्कच्या साहाय्याने मान आणि गळा स्वच्छ करावा . 


११ . जेव्हाही चेहऱ्याला पावडर लावतो तेव्हा ती मानेला , गळ्याला देखील लावावी . 


१२ . रोज चेहरा धुतांना त्याबरोबर मान , गळा देखील साफ करावा . 


Leave a Comment

en_USEnglish