* स्वरयंत्रणा आणि घसा *

     

*  स्वरयंत्रणा आणि घसा  * 

१. अगदी सर्दी पासून ते भयानक कॅन्सरपर्यंत अनेक विकार स्वरयंत्रणा व घसा  येथे होऊ शकतात . 


२ . कोणत्याही प्रकारचे तंबाखूचे सेवन , प्रदूषण काही काही प्रकारचे औषधें , पित्ताचे विकार इत्यादी गोष्टीमुळे स्वरयंत्रणा व घसा यांचे अनेक प्रकारचे विकार , बिघाड व रोग होऊ शकतात . 


३ . आवाज बसणे , कोरडा खोकला येणे , गिळण्यास अडचण जाणवणे , घटसर्प होणे अशा तक्रारी ४ ते ५ आठवडे किंवा जास्त काळ त्रास देत असतील , तर ताबडतोब वैघकीय सल्ला घेणे गरजेचे आहे . 


४ . आपल्या श्वासनलिकेच्या वरच्या भागावर अन्ननलिकेच्या पुढे स्वरयंत्रणा असते . या यंत्रणेमुळे आपण बोलू शकतो , गाऊ शकतो व विविध ध्वनी निर्माण करू शकतो . याशिवाय , चावून झाल्यावर अन्न गिळताना ते अजिबात श्वासनलिकेत जाऊ नये याची खबरदारी घेण्याचे कार्य  ही यंत्रणा करते . नाही तर लगेच ठसका लागू शकतो व तो भयानक स्वरूप धारण करू शकतो . 


५ . अन्नाला श्वासनलिकेत जाताना ‘ no entry ‘ चे कार्य एपीग्लॉटिस नावाच्या पडदेवजा अवयवाचे असते . ही यंत्रणा आयुष्यभर आपले  कार्य करीत असते . तसेच मूल जन्मण्याच्या वेळेला पूर्णपणे आपले कार्य चालू करते . तसे नाही झाले तर मातेचे दूध सर्वप्रथम पितानाच ठसका लागला  असता अथवा श्वास गुदमरला असता . 


६ . जर कदाचित अन्नाचा मोठा घास अडकला तर श्वासनलिका बंद होऊ शकते . असे काही सेकंद जरी झाले तरी अशा व्यक्तीचा प्राणवायूचा पुरवठा बंद होऊ शकतो , भांदेखील हरपून बेशुद्धवस्था येऊ शकते . आणि प्राण गमावण्याची देखील वेळ येऊ शकते अशा व्यक्तीला उभ्या स्थितीत मागून पोटावर दाब देऊन हा मार्ग मोकळा करणे आवश्यक असते . 


७ . मदत करणाऱ्या व्यक्तीने श्वास अडकलेल्या व्यक्तीच्या पाठीमागे उभे राहावे . लहान मुलांना किंवा बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीची शरीराची स्थिती आडवी ठेवावी . 


       – घ्यावयाची दक्षता व लक्षणे जाणणे  :

८ . आपल्या श्वासनलिकेत अन्नाचा घास अथवा कण जाणे हे टाळणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच इतर प्रवाही पदार्थ घशातून उलटे फिरून नाकात न जाणे हेही आवश्यक आहे . हे कार्य आपली पडजीभ किंवा युव्हीला करते . 


९ . कोणत्याही कारणाने आपल्या पडजिभेचे कार्य नीट न झाल्यास पाणी पिताना ठसका लागण्याऐवजी ते नाकातून बाहेर येऊ शकते . 


१० . स्वरयंत्रणेतील रचनात्मक बदलांमुळे ” मुलांचा आवाज फुटतो ‘ म्हणजे त्यात ‘ पुरुषी पणा जाणवू लागतो , आवाजामध्ये दमदार पणा  येतो . हा बदल पुरुषत्वास जबाबदार असणाऱ्या टेस्टेस्टेरॉन या संप्रेरकांमुळे घडवून आणला जातो . 


११ . इतर ध्वनीप्रमाणे आपल्या वैखरी वाचेचा उगम आपल्या स्वरयंत्रणेतून होतो . मोठ्याने स्पष्ट उच्च्चार करीत भाषेचा वापर करणे ही क्रिया स्वरयंत्रणा , जीभ , ओठ , दात , गाल , यांच्या एकत्रित कार्याने साधलेली असते . 


१२ . स्वरयंत्रणा व घसा यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे . त्यासाठी अतितेलकट – तिखट खाणे टाळावे , धूम्रपान किंवा कोणत्याही प्रकारचे तंबाखूचे सेवन करू नये , घसा ताणून बोलू नये , पित्ताचा त्रास होत असल्यास आयुर्वेदिक उपचारपध्द्ती घ्यावी , घट्ट शर्ट किंवा नेक टाय वापरू नये . प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी प्राणायाम , जलनेती नेहमी करावी . अतिशीतल व गरम पदार्थ खाऊ नयेत . स्वरयंत्रणा व घसा यांनादेखील ( जागेपणी ) विश्रांतीची गरज असते . 

५ . अन्नाला श्वासनलिकेत जाताना ‘ no entry ‘ चे कार्य एपीग्लॉटिस  नावाच्या पडदेवजा अवयवाचे असते , ही  यंत्रणा आयुष्यभर आपले कार्य करीत असते  , तसेच मुलं  जन्मण्याच्या वेळेला पूर्णपणे आपले कार्य चालू करते तसे नाही झाले तर  मातेचे दूध सर्वप्रथम पितानाच ठसका लागला असता अथवा श्वास गुदमरला असता . 


६ . जर कदाचित अन्नाचा मोठा घास अडकला तर श्वासनलिका बंद होऊ शकते . असेकाही सेकंड जरी झाले तरी     

Leave a Comment

en_USEnglish