घरच्या घरी मॅनीक्युअर कसे करावे

      * घरच्या घरी मॅनिक्युअर कसे करावे *

 

१ . हातांचे आणि नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी मॅनिक्युअर करणे आवश्यक आहे . 


२ . घरच्या घरी देखील मॅनिक्युअर करता येते . यासाठी लागणारे साहित्य :-

कात्री , पुशर , नेलं फाईल , ऑरेंज स्टिक , क्लिनर नेलब्रश , गरम पाणी , सौम्य शॅम्पू , हायड्रोजन ,पॅरॉक्साइड,   एक चमचा मीठ , एक चमचा लव्हेंडर तेल , कापूस आणि टब हे साहित्य गरजेचे आहे . 

घरच्या घरी मॅनिक्युअर कसे करावे


३ . सर्वप्रथम टब मध्ये गरम पाणी घेऊन त्यात शाम्पू , लव्हेंडर तेल घाला आणि त्यात हात दहा ते पंधरा मिनिटे बुडवून ठेवा . त्यानंतर नेलं रिमूव्हरने नखांवरचे नेलपेन्ट काढून टाका . कोल्ड क्रीमने नखांना मसाज करा . त्यानंतर नखांवर वाढलेली कातडी काढून टाका आणि नखांना आकार द्या . 


४ . ऑरेंज स्टिक वर कापूस लावून त्यावर हायड्रोज  पॅरॉक्साइड घेऊन नखांच्या आतील भाग स्वच्छ करा . नखांवर थोडा वेळ हायड्रोजन पॅराक्साईड लावून ठेवा . 


५ . यामुळे डाग जाऊन नखे गुलाबी दिसतात . पुशरने नखांच्या कडेची घाण काढून टाका . त्यानंतर थंड पाण्याने हात धुवुन नंतर कोरडे करा . त्यानंतर हातावर कोल्ड क्रीमने मालिश करा . या सर्व प्रक्रियेनंतर नखांवर नेलबेस लावून  नेलपेन्ट लावा . नेलपेन्टचे तीन थर लावल्यास उत्तम परिणाम मिळतो . 

या प्रकारे आपण घरच्या घरी मॅनिक्युअर करू शकतो . 

Leave a Comment

en_USEnglish