* नखांची काळजी कशी घ्यावी *
१ . हेल्दी आणि स्टायलिश नख तुमचं सौंदर्य आणखीन खुलवतात . म्हणूनच नखांची काळजी घेणं महत्वाचं आहे .
२ . रोज गाजराचा रस पिणं नखांना कॅल्शियम आणि फॉस्फरस मिळवून देईल . यामुळे नख मजबूत होण्यास मदत होते .
३ . क्युटिकल्स काढण्यासाठी / कापण्यासाठी मेटल इंस्ट्रुमेन्टचा वापर करू नका .
4 . नख लांबच लांब वाढवण्यापेक्षा त्यांना शेप द्या .
५ . आंघोळ केल्यानंतर मॅनिक्युअर करणं उत्तम . अशा वेळी नखांमधला मळ निघालेला असतो आणि नखही नरम झालेली असतात .
६ . नखांना शेप देण्यासाठी फायलरचा वापर करा .
७ . नियमितपणे मॅनिक्युअर करा .
८ . नख कापण्यापेक्षा फायलरने शेप करणं अधिक योग्य .
९ . नखांना नेलपेंट लावून नखांच सौंदर्य आणखी वाढवता येईल .
१० . नखांच्या टोकांच रक्षण करण्यासाठी नेहमी टॉप कोट लावा .
११ . नेलपेन्ट काढण्यासाठी रॉमूव्हरचा वापर आठवड्यातून एकदाच करणं अधिक फायदेशीर . अधिक प्रमाणात रिमूव्हरचा वापर केल्यास नख कोरडी होऊ शकतात .
१२ . हात धुतल्यावर लोशन किंवा क्रीम लावून हाताची स्किन आणि नखांना मॉइश्चरायझर मिळावं यासाठी व्हॅसलिन किंवा मॉइश्चरायझर युक्त क्रीमचा वापर करा . झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावा .
१३ . नख चावू नका .
१४ . नख मजबूत होण्यासाठी संतुलित आहार घ्या . यात कॅल्शियम , प्रोटीन , व्हिटॅमिन असेल याची काळजी घ्या . फळांचं प्रमाणही योग्य ठेवा .
१५ . पाणी आणि इतर द्रव्यपदार्थांचं प्रमाण योग्य ठेवा .
१६ . नख खूप लांब वाढवू नका . लांब नखांमध्ये मळ साठू शकतो . यामुळे आजारी पडण्याची शक्यता आहे .
१७ . नख साफ करण्यासाठी सोपा उपाय म्हणजे साधारण गरम पाण्यात हात पाच – सहा वेळा साबणाने स्वच्छ धुवा आणि फार टोकदार नसणाऱ्या फायलरने नीट शेप द्या .
१८ . नेलपेंट खरवडून काढू नका . यामुळे नखांवरील संरक्षणात्मक पेशी ( प्रोटेक्टिव् सेल्स ) निघू शकतात .
१९ . तुमच्याकडे नेलपेंट सुकविण्यासाठी वेळ नसल्यास त्यांना बर्फाच्या पाण्यात बुडवून ठेवा .
२० . दररोज ओला कापूस किमान दहा मिनिटे नखांवर ठेवल्यास फायदा होतो .
२१ . नखांचे पुढचे टोक अगदी त्वचेच्या जवळ कापू नये . त्वचेपासून अर्धा किंवा एक . मी . मी नख राहिल्या बरे .
२२ . नखाच्या मागचे चामडे कुठल्याही टोकदार वस्तुमागे ढकलू नये .
२३ . नखांना दहा मिनिटे लिंबाच्या पाण्यात बुडवून ठेवावे व मग नखांना आकार द्यावा .
२४ . नखे वाढवली असतील तर नियमितपणे ती स्वच्छ करणे आवश्यक आहे .
२५ . लिंबाची साल नखांवर घासावी . यामुळे नखे तुटण्याचे प्रमाण कमी होईल . तळहात , बोटे , नखे यांना दुधावरच्या सायीने मसाज करावा . यामुळे चकाकी प्राप्त होईल .