* नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी घरगुती उपाय *
* हात आणि नखांची काळजी कशी घ्यावी :-
१ . हात आणि नखांची काळजी घेण्यासाठी आठवड्यातून एकदा मॅनिक्युअर करा . घरच्या घरी मॅनिक्युअर केलं तरी कमीत कमी चार ते सहा आठवड्यातून एकदा पार्लरमधून मॅनिक्युअर करून घ्या .
२ . आंघोळीनंतर मॅनिक्युअर करणं उत्तम याच कारण म्हणजे खूप पाण्यामुळे नखातील मळ निघालेला असतो .
३ . आठवड्यातून एकदाच नेलपेंट रिमूव्हरचा वापर करा . रिमूव्हरचा अतिवापर केल्यास नख कोरडी पडतात .
४ . नखांना मॉइश्र्चरायझर पुरवण्यासाठी एखाद्या क्लिअर / ट्रान्स्परन्ट नेलपेंटचा वापर टॉप कोट किंवा सिलर म्हणून करता येईल .
५ . साबणाने हात धुतल्यावर क्रीम किंवा लोशन लावा . साबणामुळे हात आणि नख कोरडी पडतात . नखांना आणि हातांना पुरेस मॉइश्र्चरायझर मिळावं यासाठी लोशन , क्रीम लावा .
६ . झोपण्यापूर्वी हात आणि पायांना तेल किंवा मॉइश्च रायझर लावा . नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी घरगुती उपाय आहे
७ . नेलपेंट लावताना हवेशीर जागेत बसणं अधिक योग्य . खिडकीजवळ किंवा हवा असेल अशा जागेत बसूनच नेलपेंट लावा .
८ . नेलपेंट लावण्यापूर्वी नेलपेंटची बाटली हलवून घ्या .
९ . क्लिअर नेलपेंटचा बेस कोट लावल्यावर कलर नेलपेंट नखांना लावा .
१० . मध्यभाग , डावा आणि उजवा किंवा उजवा , मध्यभाग आणि डावा अशा क्रमाने नेलपेंट लावा .
११. नेलपेंट लावतांना नेहमी दोन कोट लावा . दोन पेक्षा अधिक कोट लावल्यास नखांच्या वाढीचा वेग कमी होतो .
१२ . नेलपेंटचा पहिला कोट सुकल्यावरच दुसरा कोट लावा .
१३ . ऍसिटोनचा वापर रिमूव्हर म्हणून करू नका .
१४ . नेलपेंटची बाटली थंड आणि कोरड्या जागेत , सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा . ही बाटली तुम्ही फ्रिजमध्ये ठेऊ शकता .
१५ . क्युटिकल्स काढण्यासाठी किंवा नखांवरील नेलपेंट काढताना मेटल इक्विपमेण्ट्स वापरू नका .
१६ . सर्वात महत्वाचे म्हणजे नख कुरतडू नका . नख चावल्यामुळे नख आणि क्युटिकल्स तुटून नखांचा शेप तर बिघडतोच शिवाय नखांच्या वाढीवरही परिणाम होऊ शकतो . तसच यामुळे इन्फेक्शनही होऊ शकते . नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी घरगुती उपाय आहे