नाकाचे सौंदर्य टिकवण्यासाठी उपाय

         नाकाचे सौंदर्य टिकवण्यासाठी उपाय 


१ . इतरांपेक्षा सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही जशी तुमच्या चेहऱ्याची काळजी घेता तशीच काळजी नाकाची देखील घेणे आवश्यक आहे . 

नाकाचे सौंदर्य टिकवण्यासाठी उपाय


२ . नाकाचा आकार कसाही असो पण त्याची योग्य काळजी घेऊन तुम्ही त्यास सुंदर आणि सुडौल ठेऊ शकता .          आज आम्ही तुम्हाला नाकाचे सौंदर्य टिकवण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजे आणि काय करू नये याबद्दलच्या काही खास टिप्स . 


३ . तेल पुसण्यासाठी वापर टिशू पेपर :

नाकाच्या कोपऱ्यांवर व वरील त्वचेवर खूप जास्त प्रमाणात तेल जमा होत असते . यामुळे नाकावर ब्लॅकनेस पिंपल्स या समस्या उत्पन्न होऊ शकतात . या समस्या उद्भवू नये यासाठी नाकावर तेल जमा होऊ देऊ नका . तेल पुसण्यासाठी सोबत नेहमी टिशू पेपर ठेवावा . 


४ . ऑलिव्ह ऑइल :

मेकअप काढल्यानंतर नाकाला लावा ऑलिव्ह ऑइल रात्री झोपतांना चेहऱ्यावर केलेला मेकअप काढल्यानंतर नाकावर ऑलिव्ह ऑइल , मलाई अथवा दह्याने मालिश करावी . असे केल्याने नाकाचे सौंदर्य वाढवण्यास मदत होईल व ते अधिक  आकर्षक दिसेल .


५ . दुसऱ्या व्यक्तीचा रुमाल वापरणे टाळा :

नाक पुसण्यासाठी दुसऱ्याचा रुमाल वापरणे अथवा सौंदर्य प्रसाधने वापरणे टाळा . दुसऱ्याच्या वस्तू वापरल्याने नाकाला इन्फेक्शन होऊ शकते  . 


६ . उन्हापासून करा संरक्षण :

उन्हामुळे चेहऱ्यासोबत नाकाचे सौंदर्य देखील काळे पडू शकते त्यामुळे बाहेर पडताना चेहऱ्यासोबत नाकाला देखील सनस्क्रीन लोशन लावावे . 


.  ब्लॅक हेड्स :

धुळीमुळे नाकाच्या शेंड्यावर ब्लॅक हेड्स तयार होत असतात ते हाताच्या नखांनी काढण्याऐवजी ब्लॅक हेड रिमूव्हरचा वापर करावा  . 

नाकाचे सौंदर्य टिकवण्यासाठी उपाय  

Leave a Comment

en_USEnglish