* मानेचा व्यायाम *

                        *   मानेचा व्यायाम   * 


१ . वयोमानापरत्वे मान दुखणे ही नेहमीची तक्रार होऊन जाते . मध्यमवयीन व वृध्द व्यक्तींमध्ये ‘ सर्व्हायकल स्पॉडिलोसिस ‘ हे मान दुखण्याचे मुख्य प्रमुख कारण असते . असे असेल तरी प्रत्येकाला स्पॉडिलोसिस असतो असे नाही . 


२ . नियमित व्यायामाने मानेच्या स्नायूंना बळकटी आणणे हा मान दुखीचा उपचारांमध्ये महत्त्वाचा भाग ठरतो . 


३ . मानेला स्थिरता येण्यास देखील मदत होते . अर्थात  रुग्णाला मानेचा स्पॉडिलोसिस असल्यास त्यामुळे झालेली झीज केवळ व्यायामाने भरून येणार नाही . 


४ . दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मान प्रचंड दुखत असतांना मानेचे व्यायाम करू नका . मानदुखी बऱ्यापैकी कमी झाली की मगच हे व्यायाम करावेत . 


                                 ५ .     व्यायाम क्र . १ : 

सरळ बसा . उजवा तळहात उजव्या कानशीलाच्या वरच्या बाजूस ठेऊन मान वाकवण्यासाठी दाब द्या . त्याच वेळी मान अजिबात वाकवली जाऊ नये म्हणून मानेने तळव्याच्या दिशेने जोर लावा . 


थोडक्यात काय , तर या व्यायामात तळहाताने मानेला आणि मानेने तळहाताला असा दोन्ही बाजूने जोर लावल्यामुळे मान  वाकवली जात नाही , पण त्याच वेळी मानेच्या स्नायूंवर योग्य ताण येतो . हाच व्यायाम दुसऱ्या हाताने दुसऱ्या कानशीलाच्या वर ठेऊन करा  . हाताने दाब दिल्यावर मान वाकवली जात असेल तर आपण हा व्यायाम योग्य रीतीने करत नसल्याचे समजा  . 


                                     ६ .      व्यायाम क्र . २ :

पाठ भिंतीला टेकवून उभे राहा . डोक्याचा मागचा भाग ( टाळू ) भिंतीला टेकवा . उभे राहण्याची ही स्थिती योग्य असेल तरच या व्यायामाचा फायदा होतो  .

 – आता डोक्याचा भाग भिंतीला टेकलेल्या अवस्थेतच मान खाली वाकवण्याचा प्रयत्न करा . हा व्यायाम करतांना पूर्ण वेळ टाळू भिंतीला टेकलेलीच हवी हे विसरू नका  . यातही मानेच्या स्नायूंना योग्य ताण बसतो .                               ‘ सर्व्हायकल स्पॉडिलोसिस ‘ असलेल्या व्यक्तीही हा व्यायाम करू शकतील . अर्थात मान दुखत असेल तेव्हा हा व्यायाम करू नका . 


७ . दुखण्याची जागा ओळखा : 

मानेच्या उजव्या भागात दुखत असेल तर , डावा हात वेदनेच्या जागी ठेवा आणि मानेच्या डावीकडे दुखत असल्यास  उजवा हात वेदना होत असलेल्या बिंदूवर ठेवा . 


८ . वेदना देणाऱ्या बिंदूवर दाब द्या : 

आतादुखत असलेल्या ठिकाणी बोटांनी हळूहळू दाब द्या . या दाबामुळे जास्त वेदना होणार नाहीत , याची काळजी घ्या दाब दिल्याने अति वेदना होत असतील तर  ती पध्द्त अपायकारक ठरू शकते . 


९ . डोके विरुध्द्व दिशेने झुकवा :

वेदना होत असलेल्या ठिकाणच्या विरुध्द्व दिशेने मान झुकवा . अर्थात हनुवटीने खांद्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो त्या प्रमाणे करा  . दरम्यान , स्नायू सक्रिय करण्यासाठी दाब दिल्याने तुम्हाला आराम मिळेल . 


१० . सुमारे २० स्ट्रेचिंग करा :

झोपेतून उठल्यावर आळस देतो त्याप्रमाणे त्यानंतर मान आणि पाठीवरचा भाग ताणून धरा . यामुळे वेदना कमी होतील आणि अनेकदा असे केल्याने स्नायूंना आराम मिळेल  . 


    मानेचा व्यायाम 


Leave a Comment

en_USEnglish