* मान दुखणे उपाय *
१ . साधारणतः वयाची पस्तीशी किंवा चाळीशी उलटली कि , घराच्या बाहेर भरपूर फिरणाऱ्या लोकांना मानेचे त्रास सुरु होतात आणि कधी तरी गळ्याभोवती पट्टा पडतो . स्पॉण्डिलायटिसने जखडून टाकले जाते .
२ . प्रत्येक मानदुखी ही स्पॉण्डिलायटिस्मुळेच असते असे नाही . परंतु अन्यही काही कारणांनी मानदुखी सुरु होऊ शकते . भरपूर काम करणे , संगणकापुढे बसताना आपली उंची आणि संगणकाचा स्क्रीन यांच्यात ताळमेळ नसणे किंवा मान उंच करून स्क्रीनवरचा मजकूर सतत वाचणे यामुळेही मानदुखी सुरु होते आणि डॉक्टर कडे जाण्याची वेळ येते .
३ . जगातल्या दोन तृतीयांश लोकसंख्येला कधी ना कधी तरी मानदुखीचा त्रास झालेलाच असतो असे आढळून आलेले आहे . कारण मानदुखीची कारणे फार वेगवेगळी आहेत . काही लोकांना पाठीच्या मणक्यांमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे मानदुखी सुरु होऊ शकते .
४ . प्रवासात भरपूर धक्के बसल्यामुळे सुध्दा मानेचा त्रास होऊ शकतो . त्याचबरोबर आश्चर्याची गोष्ट म्हणजे घसा दुखू लागला म्हणजे मान ही दुखू लागते . विशेषतः घशाला जर संसर्ग झाला असेल तर तो संसर्ग मानेला त्रास दायक ठरू शकतो .
५ . या मानदुखीवर काही इलाज घरच्या घरी करता येतात . यातले काही इलाज इतके सोपे आहेत की , त्यांचा औषधापेक्षाही चांगला उपयोग होतो .
६ . मेंथॉल आणि कापूर यांचा वापर जास्त उपयुक्त ठरतो . या दोन्हींचे समप्रमाणात मिश्रण करून किंवा दोन्ही उपलब्ध होत नसतील तर त्यापैकी एक बोटावर घेऊन दुखणाऱ्या मानेच्या ठिकाणी चोळल्यास त्या भागातला रक्तप्रवाह सुरळीत होऊन मानदुखी कमी होते .
७ . लव्हेंडर : लव्हेंडरचा उपयोग फार जुन्या काळा पासून औषधी म्हणून केला आहे . आता लव्हेंडर ऑइल उपलब्ध झालेले आहे . हे तेल दुखऱ्या जागेवर चोळल्यास मान दुखी कमी होते .
८ . आल्याचा उपयोगही असा होऊ शकतो . मात्र आले चोळण्यासाठी न वापरता त्याचा चहा प्यावा किंवा आल्याचा काढा घ्यावा . काही लोक आल्याचा रस काढून तो दुखऱ्या भागावर चोळतात . तोही उपाय चालतो .अर्निका या फुलापासून एक औषध बनवले जाते . ते बाजारात मिळते . तेही मानदुखीवर वापरता येते . हा उपाय मान दुखी वर गुणकारी आहे .
मान दुखणे उपाय