लठ्ठपणाची कारणे

            *    लठ्ठपणाची  कारणे    * 


– प्रत्येकीच्या जीवनात वयाच्या २५ ते ५० या वयोवर्षाच्या दरम्यान वजनात होणारी वाढ . ही कायमची असते . एकाच वयोगटातील स्रियांच शरीरातील चरबीचे प्रमाण वाढून ठराविक प्रमाणाहून १० टक्के वा त्याहून वाढले , तर अशा शरीरस्थितीस लठ्ठपणा म्हणता येईल . 


 लठ्ठपणाची कारणे  :- 

१ . अल्सर , आवड , सवय , छंद व अशक्तपणा वाटणे यापैकी कोणत्याही एक व एकाहून अधिक कारणांमुळे जर एखादी स्री अनावश्यक प्रमाणात आपला आहार वाढवत असेल ( मुख्यत्वे करून जर त्यात अधिक प्रमाणात गोड , तळकट , तुपकट खाद्यपदार्थ असतील तर ) तिचे वजन वाढतच राहते आणि तिचा लठ्ठपणा वाढतच जातो . 


२ . आनुवंशिकता हेदेखील लठ्ठपणाचे एक कारण आहे  . काहींच्या शरीराची ठेवणं अशी असते की , त्यांचे वजन थोडे जरी वाढले , तरी त्या खूप लठ्ठ वाटत राहतात . 


३ . काही वेळा एखादीच्या शरीरातील अंतःस्रावी ग्रंथीतील कंठस्थ  वा वृक्कस्थ ग्रंथीसारख्या ग्रंथीच्या कार्यात बिघाड होतो व त्यामुळे ही लठ्ठपणा वाढतो . 


४ . स्रीच्या बाळंतपणात जर नीट काळजी घेतली गेली नाही , मासिक पाळी जाण्याची वेळ आली , तरीदेखील वजन वाढते . या सर्वात महत्वाची बाब म्हणजे प्रत्येकीचा आहार किती आहे , या प्रमाणात तिचा व्यायाम हवा . तसेच जर आपला आहार योग्य नाही अथवा गरजेहून  अधिक आहे असे वाटले , तर तो कमी करणे . कमी कॅलरीजचा आहार घेणे आवश्यक असते  . ही आहेत लठ्ठपणा वाढण्याची कारणे . 


                                  – लठ्ठपणाचे तोटे  :- 

१ . प्रत्येक लठ्ठ व्यक्तीस याचे शारीरिक व मानसिक अशा दोन्ही पातळीवर धोके पत्करावे लागत असतात . यामुळे शारीरिक पातळीवर व्यंग निर्माण होणे , धाप लागणे वेगाने चालत , पळता न येणे , गुडघे / सांधदुखी , हर्निया श्वसनात अडथळे , हृद्रोग पित्ताशयात खडे होणे यासारखे अनेक आजार होऊ शकतात . 


२ . विशिष्ट प्रकारचा पोशाख व पादत्राणे घालता न येणे , ही मर्यादा लठ्ठ स्रियांवर पडते , त्यामुळे त्यानांच थोडी नाराजी येऊन त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होऊ शकतो . त्याखेरीज अन्य व्यक्ती त्यांची टिंगल करू शकतात . त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जाऊन त्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकते . यामुळे स्त्रीची आयुमर्यादाही कमी होते . म्हणूनच आहार व व्यायाम या दोन्हींची जोड देऊन लठ्ठपणा कमी करावा . 


३ . याखेरीज एरोबिक्स , योगसाधना , शल्यक्रिया करून शरीरातील चरबी कमी करणे , पळणे , जॉगिंग इ . व्यायाम प्रकार वापरून  लठ्ठपणा कमी करता येतो . परंतु विशिष्ट वयानंतर तज्ञांचा सल्ला घेऊन अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने हे व्यायाम केले , तरच फायदा होतो , अन्यथा यापासून त्यांना अपायच होऊ शकतो . 


४ . डाएटिंग हा देखील एक उपाय :

डाएटिंग हा उपाय अनेकजणींकडून केला जातो . पण जर क्रश डाएटिंग ( थोड्या दिवसात खूप कमीत कमी कॅलरीजचा आहार ठेऊन वजनात लक्षणीय घट करणे ) केले तर त्याचे अन्य अनिष्ट परिणामही स्रीच्या शरीरावर होऊन त्यापासून तिला अन्य व्याधींना तोंड देणेही अपरिहार्य ठरत असते  


  लठ्ठपणाची कारणे  






   


Leave a Comment

en_USEnglish