स्रीचे सौंदर्य

                       *   स्रीचे सौंदर्य   * 


१ . कोणत्याही संस्कृतीमध्ये स्री – सौंदर्याचे पोवाडे हे केवळ त्या स्रीच्या सुंदर मुखवट्यावरून गायले जात नाहीत तर त्या स्रीच्या सु – आरोग्ययुक्त शरीरयष्ठिचा त्यात संबंध असतो . 


२ . स्रीचे सौंदर्य – बारीक कंबर , सुरईदार मान , गोलाकार मनगटे , लांबसडक बोटे , सुडौल जांघे इ . शब्दात आपण त्यांचे वर्णन करू शकतो अथवा केलेले आढळते . 


३ . स्रीचा देह हा कमनीय , पुष्ट , पण चपळ असणे म्हणजेच तिच्या स्रीच्या सौंदर्याचे लक्षण मानले जात असे . 


४ . पुरातन भारतीय ग्रंथांचा आधार घेता सुंदर स्रीचे नेत्र हे हरणाच्या डोळ्यांप्रमाणे किंवा कमलपुष्पाप्रमाणे असावेत . तिच्या मुखाची तुलना चंद्रमाबरोबर , तर हातांना कमलपुष्पाच्या लांबसडक दांडीची उपमा देतात , पाय पोटऱ्यांना कर्दळीच्या स्तंभाची उपमा दिलेली आढळते . यावरून स्रीचे सौंदर्य हे साकल्याने विचारात घेता तिचा चेहराच नव्हे तर तिच्या पूर्ण कमनीय देहाचा विचारही येथे केला जावा . 


५ . जर आपण प्राचीन ( भारतीय वा अन्य संस्कृतीतील ) शिल्पकला किंवा चित्रकला यांची उदाहरणे विचारात घेतली कि लक्षात येते , कि यातील स्रीया कमनीय व सुडौल बांधा असलेल्या दाखविल्या गेल्या आहेत . प्राचीन वाड्मयातूनही अशाच प्रकारच्या सौंदर्याची  चर्चा / वर्णन केलेली आढळतात . या जोडीस स्रीने मन , बुद्धी व शरीर यांचा विकास एकत्रित रीतीने साधावा , हा हेतूही यातून स्पष्ट होत असतो . 


६ . यासाठी अभ्यंग व मर्दन ( मालिश ) करून केलेले स्नान , योग , ध्यान – धारणा या सर्वांचा वापर करून शरीराचे सौंदर्य विकसित  करण्याचे प्रयत्न केले गेलेले आढळतात . 


७ . आधुनिक काळातील स्रीयांनीदेखील या गोष्टीकडे आजही दुर्लक्ष करून चालणार नाही . तिनेदेखील आपल्या व्यग्र व व्यस्त जीवनातून वेळ काढून आपल्या शरीरयष्टी बाबत व सुडौल बांध्याबाबत विचार केला पाहिजे . 


८ . व्यायाम , आरोग्य व स्रीचे देह सौंदर्य या सर्वांचा सुरेख संबंध साधण्याचे प्रयत्न करावेत . यासाठी अनेक मार्ग , उपचार व उपकरणे उपलब्ध आहेत व त्यांचा वापरही त्यांनी करण्यास हरकत नसावी . 


स्रीचे सौंदर्य 

Leave a Comment

en_USEnglish