केसासांमधील कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय

         केसांमधील  कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय 


१ . केसात कोंडा झाल्यास कोरफडीचा गर केसांना १० मिनिटे लावून ठेवावा व त्यानंतर केस धुवावेत . 


२ . केसांत कोंडा झाला असल्यास दोन एस्प्रिनच्या गोळ्या कोणत्याही डँड्रफ शाम्पूमध्ये विरघळून घ्या . या शाम्पूने केस धुवा . या उपायामुळे केसातील कोंडा कमी होतो . 


३ . आवळा व शिकेकाईने केस धुतल्याने केसांतील कोंडा नष्ट होतो . 


४ . केसांच्या मुळांना लिंबाचा रस लावून २० मिनिटापर्यंत ठेवावे . मग गर पाण्याने केस धुवावेत . कोंडा काढण्यासाठी हा सर्वात उत्तम उपाय आहे . 


५ . कोंड्यासाठी कडुलिंबाचा व तुळशीचा पाला चटणीसारखा वाटून तो केसांना लावून ठेवावा व नंतर केस धुवावेत . कडुलिंबामध्ये असलेल्या औषधी गुणांमुळे कोंडा कमी होतो . तसेच गंधकाचे पाणीही केसांच्या मुळांना लावल्याने कोंडा कमी होतो . 


६ . कोंड्यामुळे खाज सुटत असलेल्या केसांना कधीही तेल लावू नये . केस धुण्यासाठी औषधी शाम्पूच वापरावा . रोज नाही तरी आठवड्यात २/३ वेळा केस धुऊन ते उन्हात वाळवावेत , हे केसांच्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचे आहे . 


७ . खोबरेल तेलात कपूर टाकून केसांना मसाज केल्याने कोंडा कमी होतो आणि त्वचा कोरडी पडत नाही . 


८ . केसांमधील कोंडा जाण्यासाठी आंबट दही केसांना लावावे व साधारणपणे १५ ते २० मिनिटात केस धुऊन टाकावे  . 


९ . तसेच आपण लिंबाचा रस केसांना लावला तर कोंड्याचे प्रमाण कमी होऊ शकते . 


१० . कपभर पाण्यात बोरिक पावडर आणि लिंबू रस मिसळून हे मिश्रण केसांना लावल्याने कोंडा साफ होतो . हा उपाय केसांमधील कोंडा जाण्यासाठी घरगुती सर्वात उत्तम उपाय आहे  . 


११ . मेथीची पावडर कोंडा कमी होण्यासाठी उपयुक्त :-

मेथीच्या दाण्यामध्ये केसांना पोषक अशी सर्व तत्वे असतात . 

१ . मेथीच्या दाण्यामध्ये फॉस्फेट , लेसिथीन , न्यूक्लिओ – अल्ब्युमिन आणि कॉड लिव्हर ऑईलबरोबरच फॉलिक ऍसिड , मॅग्नेशियम , सोडियम , जस्त , तांबे , नियासिन , थायामीन , कॅरोटीन अशी पोषकद्रव्य असतात . 

२ . ही पोषकद्रव्य केसांच्या मुळांना मजबूत करतात . 

३ . मेथीच्या दाण्यांचे ग्राइंडर मध्ये चूर्ण करून पाण्यात कालवून त्याची पेस्ट तयार करा . 

४ . यामुळे केस काळे , दाट आणि लांबसडक होतीलच शिवाय कोंड्याची समस्याही नाहीशी होईल . 


१२ . कांदा मिक्सर मध्ये बारीक करून त्याचा रस काढा आणि तो रस डोक्याच्या त्वचेला मालिश करा . 

यानंतर टॉवेलने बांधून ठेवा . त्यानंतर ३० मिनिटाने केस शाम्पूने धुवून घ्या , यामुळे केसांमधील कोंडा जाण्यासाठी मदत होते  . 


१३ . संत्र्याचा रस केसांमध्ये कोंडा कमी होण्यासाठी उपयुक्त :-

जर तुमच्या केसांमध्ये कोंडा आणि स्कैल्प ऑईली होत असेल तर संत्री सोलून त्याचा गर मैश करून केसांवर हेअर पॅक म्हणून लावा . असे आठवड्यातून एकवेळ करा . 

जर 


केसांमधील कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय 

Leave a Comment

en_USEnglish