गरोदरपणात काय खावे

                   गरोदरपणात काय खावे 


१ . गर्भवती स्री ही एक नव्हे , तर दोन जीवांचे पोषण  करत असते , म्हणूनच तिचे आरोग्य व  पर्यायाने सौंदर्य यांची जपणूक व्हावी . या काळात प्रत्येक स्त्रीचा आहार पौष्टिक  संतुलित असावा . भ्रूणाची सामान्य व अविकृत वाढ होण्यास असा आहार जरुरी असतो . सामान्यतः रोज २६०० कॅलरीयुक्त संतुलित आहार जर गरोदरपणात घेतला , तर तो खात्रीने उपयुक्त ठरतो , असे तज्ज्ञांचे मत आहे . 

२ .गरोदरपणात काय खावे :-

यामध्ये दुधाचा समावेश प्रामुख्याने हवा . प्रोटिन्स अधिक मिळावीत यासाठी डाळी ,कडधान्ये इ .आहारात असावीत .आहारात आयोडीन हवे अन्यथा दातांचे विशिष्ट विकार जडू शकतात .तसेच जीवनसत्त्वे तर मानवी देहास जीवन देणारीच असतात .म्हणूनच पालक ,मेथी ,चवळई ,मुळा पाने ,हिरवे सॅलड इ .खावे .

३ . लोहतत्वे मिळावीत म्हणून मेथी ,मटार ,सफरचंद ,कारले ,पुदिना ,काजू इ .पदार्थ खावेत .मुलांचे दात व हाडे बळकट व्हावीत .यासाठी या मातेने आपल्या दैनंदिन भोजनात तीळ ,बदाम ,दूध ,चणे ,उडीद ,मूग इ .डाळी यांचा समावेश करावा .यामुळे मातेसही आपले आरोग्य सावरणे शक्य . होते 

४ . मातेच्या दैनंदिन आहारात  खूप गोड ,तेलकट ,मसालेदार खाद्यपदार्थाची रेलचेल नसावी ,कारण यामुळे तिला अपचन त्वचेवर विपरीत परिणाम होणे इ .प्रकारचे त्रास होऊ शकतात .

५ . शिळे उघड्यावरील अथवा जेथे स्वच्छतापालन होत नाही ,अशा ठिकाणचे अन्नही तिने खाऊ नये ,कारण यामुळे तिच्या पोटात नको ते विषाणू जाऊन त्यांचा तिला व तिच्या भ्रूणासही त्रास होऊ शकतो .यामातेने नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात पाणीही प्यावे .त्यामुळे तिच्या पचनास मदत होते व उत्सर्जन प्रक्रियाही वेगाने व नियमित घडते .त्यामुळे तिची त्वचाही नितळ ,तारुण्यपिटीकारहित राहण्यास मदत होते .बद्धकोष्ठ ही होत नाही .अशा प्रकारे हि काळजी घ्यावी .


गरोदरपणात काय खावे 

Leave a Comment

en_USEnglish