पिंपल्स वर आयुर्वेदिक उपाय

     पिंपल्स वर आयुर्वेदिक उपाय 


१ . कडुलिंब :- 

कडुलिंबाची निंबोळीचा लगदा चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स ( मुरूम ) कमी होतात . 


२ . पिंपल्स घालविण्यासाठी कारल्याची साल चेहऱ्यावर चोळावी . यामुळे पुटकुळ्या , काळी वर्तुळे , काळे डाग निघण्यास मदत होईल . हा उपाय साधारणतः तीन ते पाच दिवस करून पाहावा . 


३ . लिंबाच्या रसात गुलाबपाणी , मध आणि ग्लिसरीन समप्रमाणात मिसळून रोज चेहऱ्याला लावल्याने मुरुमे , पिंपल्स , सुरकुत्या आणि रखरखीत पणा नाहीसा होतो . ४ . मुलतानी माती :-

मुलतानी माती आणि गुलाबपाणी यांचा लेप चेहऱ्यावर लावल्याने त्वचा मुलायम राहते . सोबत पिंपल्स येत नाहीत . 


५ . पाण्यात भिजलेल्या मुलतानी मातीत थोडीसी जवची कणिक आणि हळद पूड टाकून तयार झालेले मिश्रण आंघोळीपूर्वी चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स कमी होतात व चेहराही खुलतो  . 


६ . दही :- दही किंवा ताकात ओव्याची पूड टाकून त्याचा लेप चेहऱ्यावर लावून काही वेळानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाकावा . मुरूम जाण्यास फायदा होतो . 


७ . लिंबाचा रस , तुळशीच्या पानांचा रस , गुलाब पाणी व ग्लिसरीन हे सारख्या प्रमाणात मिसळून एका काचेच्या पात्रात एकत्र करावे . हा लेप चेहऱ्यावर लावल्यास पिम्पलची समस्या दूर होते . 


८ . हळद , दही व बेसन एकत्र करून तयार झालेला लेप चेहऱ्यावर लावावा . एक तासानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाकावा .


९ . दालचिनी :-

थोडीशी दालचिनी पेस्ट घेऊन त्यात थोडेसे मध घालावे . हे मिश्रण मुरुमांवर लावून रात्रभर तसेच ठेवावे , दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा धुऊन टाकावा  . 

असे आठवड्यातून २ ते ३ दिवस सतत केले तर पिंपल्सची समस्या दूर होते . 


१० . जायफळ :-

जायफळाची बारीक पावडर बनवा . त्यात योग्य प्रमाणात दूध घालावे , हे मिश्रण चेहऱ्यावर व्यवस्थितपणे लावून सुकल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवावे , औषधी गुण असलेले जायफळ आणि दूध पिम्पल्सवर चांगले गुणकारी ठरते . 


११ . संत्री :- 

संत्र्याची पावडर २ चमचे घेऊन यात लिंबाच्या रसाचे दोन – तीन थेंब आणि भुईमुगाच्या तेलाचे थोडेसे थेंब टाकावेत . ही पेस्ट पिंपल्सवर व्यवस्थित लावावी . आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा लेप चेहऱ्यावर लावावा . 


१२ . लिंबू :- 

 लिंबाच्या रसाने पिंपल्स कमी होतात . पण , लिंबू चेहऱ्यावर थेट वापरणे योग्य नाही , यामुळे उकळत्या पाण्यामध्ये लिंबाच्या रसाचे थेंब टाकावे त्यात थोडेसे कापसाचे बोळे टाकावेत काही वेळानंतर पाण्यातील कापसाचे बोळे काढावेत आणि ते पिंपल्सवर  ठेवावेत . यानंतर १५ मिनिटानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा .


१३ . चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर तुळस , पुदिना , कडुलिंबाच्या पानाची पेस्ट चेहऱ्यावर लावावी . १५ ते २० मिनिटांनी चेहरा धुवावा . यामुळे चेहऱ्यावर वेगळी चमक येते . 


१४ . त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्या आवडत्या तेलात मीठ टाकून स्क्रब करावे . याने पिंपल्स नाहीसे होतील . तुम्ही बदामाचे तेलही वापरू शकता . पाच चमचे बदाम तेल आणि दहा चमचे मीठ मिसळून चेहऱ्यावर स्क्रब करावे .


१५ . गुलाबपाणी आणि कापूर यांचे मिश्रण एका बाटलीत भरून फ्रिज मध्ये ठेऊन घ्या . पिंपल्स जेव्हा होतील , त्यावेळी कापसाने हे मिश्रण चेहऱ्यावर लावा . 


१६ . संपूर्ण चेहऱ्यावर पिंपल्स पसरले असतील तर हळद आणि कडुलिंबाची पाने एकत्रित वाटून त्याची पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा . त्याने चेहरा स्वच्छ होईल , कारण लिंबाची पाने रोगप्रतिकारक असतात . 

पिंपल्स वर आयुर्वेदिक उपाय 

Leave a Comment

en_USEnglish