उपकरणांच्या वापराचे फायदे
आधुनिक स्त्रीला जर आपले सौंदर्य टिकवून ठेवायचे व त्यात वाढ घडवून आणायची असेल, तर त्यासाठी तेवढ्याच आधुनिक उपकरणांचा आधार घेणे जरूर ठरते. आजकालच्या आधुनिक युगात स्नायुपेशीतं ढिलाई येणे, वाढते रोग, शरीरावर चढणारे चरबीचे थर या सर्व कारणांमुळे स्त्रीची जीवनशैली आणि व्यक्तिमत्व यावर विपरीत परिणाम घडत आहेत.
स्त्रीला आपल्याकडे आपला बांधा, देहसौंदर्य यांच्या कडे, त्यांच्या सुडौलतेकडे लक्ष देण्यासही फुरसद मिळत नाही. याचा परिणाम म्हणजे अखेर तिचे शरीर बेडौल बनून तिच्या सौंदर्यास बाधा येते
यासाठीच कमीत-कमी जागेत शिस्तबध्द व परिणामकारक रीतीने शरीर-आरोग्य सुधारण्याचे प्रयत्न स्त्रीने करावेत व त्यासाठी आज-काल बाजारात उपलब्ध असलेली भिन्न प्रकाराची व्यायाम करण्याची उपकरणे तिला उपयोगी पडतील. व्हरांडा, बाल्कनी, बेडरूमधील रिकामी जागा या ठिकाणी सहजतेने या उपकरणांचा वापर करता येतो. ही उपकरणे सातत्यपूर्ण रीतीने वापरावीत म्हणजे त्यांचे परिणाम योग्य घडतात. मध्येच त्यांचा वापर बंद करू नये. अन्यथा वजन वाढते.
प्रत्येक उपकरण का व कसे वापरावे? यांची माहिती देणारी पुस्तिका प्रत्येक उपकरणाबरोबर आलेली असते. तिचा वापर करावा व ते नसल्यास ही माहिती विक्रेता, उत्पादक यांच्याकडे मागावी. ते पूर्ण वाचून घ्यावी व नंतरच तिचा उपयोग करावा. प्रत्येकीने जर यांचा तंत्रशुध्द वापर केला, तर नक्कीच तिला आपला बांधा सुडौल ठेवण्यासाठी व शरीरात उत्साह व स्फूर्ती यांचा संचार होऊ देण्यासाठी मदत मिळेल. यांच्या वापरामुळे आपल्या शरीरावर चढू लागलेले अनावश्यक चरबीचे थर कमी करणे सहज शक्य होते.
ब्युटी पार्लर अथवा हेल्थ क्लिनिकमध्ये लठ्ठ अनामत रक्कम भरून आपल्याला यांचा वापर करत येतो, पण घरगुती पातळीवर या उपकरणांची खरेदी करून शरीराच्या विविध भागांवरील चरबी कमी करण्याचे प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील. यामध्ये आजकाल बाजारात व्हायब्रेटरी बेल्ट, बॉडी मसाजर, ब्रेस्ट डेव्हलपर, स्टँडिंग ऍंड सिटिंग ट्रिस्टर इ. प्रकारची उपकरणे समाविष्ट करता येतील.
वॉर्मिंग – अप व्यायाम Shapely build and equipment benefit
कोणत्याही प्रकारचे व्यायाम करताना त्याआधी वॉर्मिंग-अप करणे किंवा शरीराची व्यायामासाठी पूर्वतयारी करणे आवश्यक ठरते. यामुळे स्नायुपेशींना बळकटी येते, त्यांचा नाजूकपणा कमी होतो आणि ठेचा लागणे, जखमा कमी होणे, यांचे प्रमाणही येथे कमी होते. यासाठी सायकलिंग अथवा एकाच जागी स्थिर उभे राहून मार्चिंग केल्याप्रमाणे चालणे आवश्यक असते( ३ ते ५ मिनिटे) यामुळे नंतर व्यायाम करताना जो घाम येतो, त्याचे प्रमाण कमी होते व यानंतरच उपकरणे वापरून व्यायाम करण्यास शरीर तयार होते. व त्याचा आतील भाग जमिनीस टेकवता येईल तेवढा टेकवा. यानंतर पूर्ववत् स्थितीत पाय ठेवा आणि दुसऱ्या पायाने नेमका हाच व्यायाम याच क्रमाने करा.
भिंतीला पाठ टेकवून ताठ उभे रहा. दोन्ही हातही सरळ रेषेत शरीरालगत व ताठ ठेवा. पोट जेवढे आत ताणता येईल, तेवढे ताणा व श्वास ओढा. अलगद टाचा वर उंचवा ओढ लागली, की टाचा परत खाली टेका. जेव्हा जेव्हा उभे राहिले असाल अथवा बसला असाल, तेव्हा श्वास ओढून पोटाचे स्नायू आत ताणून घेण्याचे (जेवढा वेळ घेता येतील तेवढा वेळ) प्रयत्न करा व नंतर अलगदपणे श्वास सोडा. चालताना शरीर ताठ ठेवून चाला. शरीर ताणून घ्या. डोके, खांदे, व पोट यांच्या स्नायुपेशी मजबूत व घट्ट होण्यासाठी हे व्यायाम उपयुक्त ठरतात फक्त ताण बरोबर रीतीने, वेळ व ढब ठेवून देता यावा. अन्यथा परत एखादा स्नायू ताणला जाऊन आखडला जाऊन त्रास होऊ शकतो.
पोट सपाट करण्याचे व्यायाम Shapely build and equipment benefit
उंची, वय, वर्ण यांच्या सौंदर्याचा संगम जरी स्त्रीत झाला असला, तरीही तिचे बाहेर आलेले पोट, तिच्या सर्व व्यक्तिमत्वाचा व बांध्याचा, डौलदारपणाचा नूर घालवते. म्हणूनच अशा स्त्रियांनी जर रोज दिवसाकाठी थोडा वेळ काढला, तर त्यांना आपले पोट सपाट करणे व त्यावर जमलेली जादाची चरबी कमी करणे जमू शकेल. यासाठी त्यांनी पुढील काही आवश्यक बाबी विचारात घ्याव्यात.
व्यायाम कराताना हलके, ढिले, आरामदायक कपडे घालावेत. उदा. टी-शर्ट व टाइट्स्, लिओटाड्र्स इ. व जेथे लेटून व्यायाम करणार, तेथे सतरंजी, चादर पसरावावी.
व्यायाम करण्याआधी दोन तास काहीही खाऊ नये. व्यायाम झाल्यावर शरीर शिथिल सोडून त्याचा ताण कमी करण्याचे प्रयत्न करण्यास विसरू नये किंवा जमिनीवर लोळल्यासारखे करावे व तेव्हा दोन्ही हात मागे धरून खेचावेत. हे करताना मनात आठ आकडे मोजा व यानंतर हात परत ढिले सोडावेत.
आता उठून बसा व ताठ बसा, पाय परस्परांवर क्रॉस करून टाका. उजव्या हातास मुडपा व पंजा खांद्यावर ठेवा. डाव्या हातानेही करावे. मग दोन्ही हात शरीराच्या बाजूस ताठ ठेवावेत व डावा हात ताठ ठेवूनच उजव्या गुडघ्यावर ठेवावा. तेव्हा कुठेही वाकू नये. आठ आकडे मोजा. मग हात पूर्ववत् घ्या शरीर शिथिल सोडा.
वॉर्म-अप् व्यायाम Shapely build and equipment benefit
प्रत्यक्षात हे व्यायाम सुरू करण्याआधी हे व्यायाम – प्रकार करावेत. शरीर व स्नायूपेशींना क्रियाशील करण्यास याचा उपयोग होतो व पुढील व्यायाम करणे सोपे जाते.
प्रथम ताठ उभे रहा व पिंगा घातल्यासारखे शरीर चौफेर फिरवा. मग एक पाय जमीनवीवर व दुसरा जांघेवर ठेवा व जागीच उभे राहून दोन्ही हातांनी मार्चिंग केल्याप्रमाणे हात हलवा.
सिंगल आर्म रो
उभे रहा. मग डाव्या पायावर उभे रहा व उजवा पाय त्याच्या पुढून माहे न्या. हे करताना डाव्या पायाचा गुडघा किंचित वाकवा.
द कर्ल
पाठीवर जमिनीवर लेटा. पाय नितंबांपर्यंत दुमडा. गुडघे वाकवा व पाय जमिनीवर ठेवा. पेल्विस बोन झूकवून पोट थोडे आत दाबा, असे आठ वेळा करा. यानंतर मान थोडी वर उचला. तेव्हा दोन्ही हात शरीरालगत तळवे जमिनीवर ठेवून सरळ ठेवा. मग दोन्ही पाय जमिनीस आडव्या व समांतर रेषेत वर उचला गुडघे वाकवू नका. चारपर्यंत आकडे म्हणा. मग पाय खाल
शरीराच्या दोन्ही बाजूंस ताठ, सरळ, पण सैल ठेवा. मग पाय अलगद वर करा. मग गुडघ्यांत वाकवून क्रॉसस करा. मग खांद वर उचलून जेवढे डोके वर उचलता येईल, तेवढे उचला. आठपर्यंत आकडे मोजा. मग पाय खाली आणा व शरीर शिथिल सोडा.
फायदे
स्त्रीचे शरीर सुडौल आणि योग्य आकारात राहते. वाढते वय आणि मानसिक तणाव यांचा स्त्रीच्या शरीरावर होणारा प्रभाव कमी कमी होत जातो. सांधे मजबूत राहतात व स्नायूंपेशीही मजबूत होतात. त्वचा कांतिमान बनते. देहाची कार्यक्षमता वाढीस लागते. फुफ्फुसे व हृदय यांचे कार्यही योग्य प्रकारे व दिशेने चालू राहते. शरीरात असलेली जादा चरबी विरघळते. पाय, पोटर्या, नितंब यांना योग्य आकार प्राप्त होतो. आपल्या शरीरातील रक्ताभिसरण योग्य प्रकारे घडू लागते.
आधुनिक उपकरणे वापरा, पण…
प्रथमत: उपकरणांचा वापर करताना कमी काळासाठी करावा. त्याची सवय व सराव झाल्यावरच त्याचा वेळ वाढवावा.
या उपकरणांचा वापर करताना श्वास रोखून न धरता सामान्यतः जसा श्वास घेतो, तसाच घ्यावा.
जर आपण एखाद्या आजाराने ग्रस्त असाल, तर वैद्यकीय सल्ला न घेता या उपकरणांचा वापर सरावासाठी करू नका.
डोकेदुखी, चक्कर येणे, पाठदुखी, उलट्या होणे इ. प्रकारचे त्रास जर होत असतील, तर या उपकरणांचा वापर तात्पुरता तरी बंद करावा.
जेव्हा एखादे उपकरण वापरून व्यायाम करत असाल, त्या वेळेस तुमचे सर्व चित्त, अवधान त्यावर असावे. मनात अन्य विचार, चिंता, काळज्या इ. चा त्रास तेवढ्यापुरता देऊ नये.
कूल डाऊन
उपकरण वापरण्याच्या आधी ज्याप्रमाणे वॉर्मिंग अप् आवश्यक असते, त्याचप्रमाणे त्याच वापरानंतरही कूल डाऊन होणे तेवढेच अगत्याचे असते. यासाठी पुढील प्रकार/ प्रकाराचे व्यायाम करू शकता.
जमिनीवर पाठ टेकवून सपाट झोपा. दोन्ही हात डोक्याच्या दोन्ही बाजूंनी पुढे सरळ पसरवा ( १५ सेकंद)पाठीवर व तोंड वर करून जमिनीवर सपाट झोपा दोन्ही गुडघे हळूहळू वर उचलून छातीपर्यंत आणा, परंतु यावेळेस नितंब वर उचलले जाऊ देऊ नका (१५ सेकंद)ताठ उभे रहा. एका वेळी एकच हात खांद्यातून गोल गोल फिरवा. जर श्वास वर चढला असेल, तर १५ सेकंद शवासन करा.
*सूचना- वरील दिलेला आयुर्वेदिक उपाय,सल्ला अमलात आणण्यापूर्वी आपल्या डॉक्टर व तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावेत*