Computer Chi mahiti संगणकाची वैशिष्ट्ये १. गती (Speed) :- संगणक हजारो-लाखोंची गणना किंवा आकडेमोड सहज करू शकतो. एका व्यक्तीला हे काम करण्यासाठी भरपूर दिवस लागू शकतात तर संगणक हेच काम काही सेकंदात करू शकतो. Computer ची Speed ‘Hertz’ (HZ) या एककात मोजली जाते.
२. अचूकता (Accuracy):- संगणकाकडून तयार केलेली माहिती ही अगदी अचूक असते. जर ती चुकीची आलीच तर वापरकर्त्याच्या चुकीमुळे Error येऊ शकतात. किंवा व्हायरसमुळे errors येऊ शकतात. म्हणून संगणकाला पुरवलेला data सुद्धा अचूक असला पाहिजे.
३. साठवणूक क्षमता (Storage Capacity):- संगणकामधे खूप मोठ्या प्रमाणात माहितीची साठवणूक करता येते. लक्षावधी दस्तऐवज-फाईल्स साठवण्याची क्षमता कॉम्पुटर मध्ये आहे. उदा. हार्ड डिस्क ड्राईव्ह(HDD), CD, DVD Disc, USB Pen Drives इत्यादी. संगणकात साठवलेली माहिती बाईट (Byte) या एककात मोजतात. ‘0’ आणि ‘1’ या स्वरूपात असलेल्या ‘8’ Bits मिळून ‘1’ Byte तयार होते. माहिती मोजण्याची आणखी काही एकके पुढीलप्रमाणे 1024 Byte = 1 KiloByte (KB) 1024 KB = 1 MegaByte (MB) 1024 MB = 1 GegaByte (GB) 1024 GB = 1 TeraByte (TB) ४. एकाग्रता (Concentration):- संगणक हे इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे. म्हणून एकाच प्रकारचे काम केल्याने मानसिकदृष्ट्या थकवा किंवा कंटाळा येणे या गोष्टी होत नाही. एखादे काम करण्यासाठी आज्ञावली किंवा सूचना दिल्यास पुढील काम संगणक त्याच्या मेमरीनुसार व्यवस्थितपणे करत असतो, त्याकडे वारंवार पाहण्याची गरजही भासत नाही. ५. अष्टपैलूपणा (Varsatillity) संगणक मुख्यतः आकडेमोड करणे याबरोबरच तुलना करणे, माहिती गोळा करणे, माहितीची देवाणघेवाण करणे अशी कामे करू शकतो. म्हणून विज्ञानामध्ये संशोधन करण्यासाठी संशोधक व सर्वच क्षेत्रामध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. ६. स्वयंचलित यंत्र (Automation):- संगणकाला एकदा नेमून दिलेले कार्य पूर्ण होईपर्यत तो करत राहतो. आपण ज्याला प्रोग्रामिंग असे म्हणू शकतो. आणि हे कार्य खात्रीलायक असे असते. संगणक स्वयंचलित यंत्राप्रमाणे कार्य करीत असतो.